This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Saturday 29 January 2022

नवे वर्ष नव्या आशा Happy new year2022


२०२१ चे आभार आणि नवीन वर्षाचे मनापासून स्वागत. २०२१ मध्ये जीव वाचवून नवे जीवन जगतोय, हेच खूप आहे. कोरोनाचा भर असताना सुरक्षीत असलेल्या माझ्या कुटूंबाला २०२१ सुरू होण्याआधीच आजारांनी गाठलं. सर्वात पहिले सासूबाईंना शेवटच्या स्टेजचा कोरोना. त्यातच त्यावेळी सरकारी दवाखान्यात गेलं की आपले प्रेतच बाहेर येणार हीच धारणा सर्वांची झाली होती. तेव्हा सासूबाईंना अखेर आम्हाला कोविड सेंटरमध्ये ते देखील फोना फोनी करून भरती करावं लागलं होतं. 
परिस्थितीला अनुसरून सासूबाईंच्या कोरोनानंतर फेब्रुवारी २०२१ मध्येच आम्ही माय लेकांनी नागपूरहून गडचिरोलीला नव-याजवळ येण्याचा निर्णय घेतला. एकत्र मुलाला सांभाळण्याचे डोळ्यात स्वप्न घेऊन. पण, आजारपणांनी काही पाठ सोडली नाही. किरकोळ आजार ते त्याचं एक ऑपरेशन.... यामधूनही बाहेर पडले. म्हटलं, आता एकत्र आहोत सोबत मिळून छान राहतोय. दोन – अडीच वर्षांची कसर भरून काढूया... आनंदी होते. नवरा, मुलगा एकत्र कुटुंबात रमले होते. सोबतच वर्क फ्रॉम होम सुरू होतंच. मात्र, आमचा आनंद... परिस्थितीला की, वेळेला पाहावला नाही बहुदा आणि १५ ऑगस्टच्या संध्याकाळी एका भयंकर संकटाला सामोरं जावं लागलं.  
अर्धडोक्याने पलंगावर पडलेल्या माणसाच्या मेंदूची परीक्षा की काय, म्हणून अपघाताच्या पंधरा दिवसातच  दिराला हार्टअटॅक आला. क्षणाचीही वेळ न देता डॉक्टरांनी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यासाठीचा निर्णय घ्यायला भाग पाडलं. शेवटी डॉक्टर आणि जीवापूढे काहीही नसतं तेच खरं. यावेळी मात्र, वेळेनी आनंदची चांगलीच परीक्षा घेतली. दिराला हार्ट अटॅक हे शब्दच आम्हाला हादरवून सोडणारे होते. तरीही, मानलं पाहीजे नव-याला. ज्याला अद्याप आपल्या स्वतःच्या मुलाचे नावंही घेता येत नव्हते, त्यांनी ती संपूर्ण परिस्थिती, त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च  सांभाळला. यावेळी संपूर्ण कुंटूंबाने जमेल तशी आर्थिक मदत केली. नातेवाईकांच्या साथीने आर्थिक खर्च निभवून नेऊ शकलो. 
या सर्व संकटातून आम्ही आता सावरतोय. नवरा पून्हा कामाला लागला यासाठी डॉक्टरांचे (डॉ. शार्दूल वरगंटीवार) यांचे खूप खूप आभार. सोबतच नव-याच्या सहका-चेही आभार.
या संकटात मला खंबीर साथ देणारे माझे बहीण जावई,  दिर, नणंद - नणंदई यांच्यासोबतच माझा संपूर्ण मित्र परिवार. माझा ‘संपर्क’चा परिवार आणि फेसबूकवरील सर्व वरिष्ठ आणि मित्र- मैत्रीणी आपणा सर्वांची खरोखर मी ऋणी आहे. मला ऋणातच राहू द्या. 
आनंदच्या वाढदिवशी (२३ऑक्टोबर) आपण सर्वांनीच त्यांना उंदंड आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडिया वगैरे पासून दूर राहणा-या माझ्या आनंदची फेसबूक वॉल त्या दिवशी अगदी शुभेच्छांनी भरून गेली होती. त्यावेळी प्रत्येकाचे आभार मानणे शक्य झाले नाही आणि आभार वगैरे माणून इतक्या प्रेमळ शुभेच्छांना शिळं नाही होऊ द्यायचं म्हणूनही ते राखून ठेवलं होतं. आता वर्षाच्या शेवटच्या दिवशी मला ते आवर्जून सांगावसं वाटलं आणि इथे बोलले. खूप छान आहात सगळे, असेच सदैव आमच्या सोबत राहा. 
नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहूया....आनंदी जगूया...