Wednesday 26 September 2018

छोटूशा कान्हाला सुखरूप ठेव

रात्रीचे दहा वाजलेले... (गडचिरोलीत हे एक डॉ. रात्री 10 पर्यंत हमखास असतातच) एक मध्यमवर्गीय जोडपं, आपल्या बाळाला घेवून दवाखान्यात आले होते. आहे त्या परिस्थितीत ते घरातून निघाले असतील असं एकूणच त्या बाळाच्या आणि त्यांच्या कपड्यांवरून अंदाज आला. एखाद्या घरगूती पूजेच्या कार्यक्रमातून ते थेट ईथे आले असतील असंच त्या महिलेच्या हळदी कुंकूनी भरलेल्या कपाळावरून स्पष्ट दिसत होतं. आत डॉक्टरांच्या केबीनमध्ये जाण्यापूर्वी नर्स ने त्या बाळाचं वजन करायला सांगीतलं. तेव्हा समजलं ते बाळ आत्ता 10 महिन्याचं आहे. वजन काट्यात बाळाला ठेवलं तेव्हा ते बाळ सारखंच उचकी देत होतं. ते पाहूनच मनात पटकन धस्स झालं, कारण त्याचं उचकी देणं साधारण वाटत नव्हतं, बराच वेळचं उचकी देत असावं अक्षरश: त्याला श्वास घ्यायलाही त्रास होत होता, बाळ सुन्नं झालं होतं, मनात एकदम काळजीपोटी वाटलं काय, हिने त्या पिल्लाला दूध तर पाजलच असेल ना तरीही त्याची उचकी का नसेल थांबली. ?
ते दोघे पटकन केबीन मध्ये गेलेत. " डॉक्टर, बाळ 6 वाजता पासून खूप खूप रडत आहे. त्याचं रडणं थांबतच नाहीये. सारखा रडतोय... पातळ शी पण करतोय. तोंडाला फेस पण येतोय. हे सगळ त्या बाळाची आई डॉक्टरांना सांगत होती. बाहेर सगळं सहज ऐकू येत होतंच. आम्ही तिथून निघतच होतो, तोच लगेच आमच्या सोबतच अगदी दोन मिनटातच ती महिला केबीनमधून बाळाला घेवून हूंदके देत रडत रडत बाहेर आली आणि लगेच कार मध्ये बसून ते निघाले. न राहवून धावत त्यांच्याकडे गेले आणि जरा विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती काही बोलायच्या आत तीचा नवरा बोलला, नाही, काही नाही. आणि वेगात पूढे निघाले.
(आम्ही दोघं - आनंद- अरे काय झालं असेल त्या बाळाला, एकदम एकाच मिनटात केबीन बाहेर आलेत आणि सारखीच रडतेय ती बाई. तुलना जा विचारतेस का डॉक्टरांना.
मी विचारायला गेले तर डॉं. आत दुसरे पेशंट तपासत होते आणिं माझंही मग धाडस नाहीच झालं त्यांना काही विचारावं वगैरे.
काय झालं असेल यार त्या बाळाला.
आनंद - अरे हो ना, 6 वाजता पासून ते लेकरू रडतंय म्हणतात, मग असं कसं इतक्या उशीरा त्यांनी दवाखाण्यात आणलं. मी सांगतो ना तुलना, आज कान्होबा आहे जिकडे तिकडे , त्यांच्याही घरी असेल कान्होबा. त्या धामधुमीत त्या लेकराच्या रडण्याकडे दूर्लक्ष झालं असेल.
अहो पण काहीही असलं तरी आईचं लक्ष असतंच ना.


आनंद - हो पण असेल ती घरात पूजेच्याच कामात, त्यांच्याकडे पाहून तरी तेच दिसतं होतं. पाहिलं नाहीस, हळदी कुंकू नी भरलेलं कपाळच सांगत होतं. आणि रडून रडून पार त्या लेकराचे आतडे लोंबून गेले, एवढं ते लेकरू रडून बेजार झालं आणि काय करत असतील हे लोकं घरी. आणि तसंही ते इथलेच प्रॉपर दिसतायेत, बरं नसेलही तरी त्यांना माहित तर असेलच ना, इथले दवाखाने रात्री 9 नंतर बंद होऊन जातात, तर आधी लेकराला दवाखाण्यात नेवू दे असं नाही, बसले असतील पूजा आरत्या करत आणि घरगुती उपाय करत आणि त्या एवढ्याशा जीवाचे रडून हाल हाल झाले तेव्हा आले. आता डॉक्टरांनी तरी कुठे घेतली ती केस, दुसरीकडे कुठे रेफर केलं असणार. आता सरकारी दवाखाण्यातच पाठवलं असणार. त्यात त्या डॉक्टरांची तरी काय चूक, त्यांच्या हाताबाहेर केस असताना ते तरी कुठे रिस्क घेतात..... , म्हणून म्हणत असतो आधी लेकराकडे लक्ष देत जा.
- हंम्म... अरे... आता तुम्ही नका सुरू होऊ. कुठलं कुठेही काय!!)
असो...
(#ईश्वरा तुझं अस्तित्व तूच जाणो, पण त्या छोटूशा कान्हाला सुखरूप ठेव.)
#भारतीयसणसमारंभ आणि #आम्ही
#RisingINDIA

2 comments:

  1. अति सुंदर मनाला स्पर्श करणारी स्टोरी ....कमी वाक्यात सर्व काही ....Samandar ko koozhe me samoya hai ...best efforts mam

    ReplyDelete