Monday 4 November 2019

yatharth diary

यार, तू असंच करतोस बघ. ऑफीसमधून मधला वेळ काढून आई आपल्याला शाळेतून घ्यायला येते. एवढ्या वेळात घरी जाऊन फ्रेश होणं, जेवण भरवणं मग पाळणाघरात सोडणं...एवढं सगळं आटपून तासाभराच्या आत मला ऑफीसला पोहचावं लागतं ना रे..तरी तुझं आपलं... नुसता इथे तिथे वेळ घालवतो...

एवढ्यात शेजारच्या स्वाती काकूंचा आवाज येतो निरज....
'आई एक विचारू.... आता काय? विचार...
स्वाती काकूंना ऑफीस नसतं का?
हं... आता नसतं. कारण  पुष्कर दादा मोठा झाला तो जर्मनीला गेलाय ना... आता निरज दादा पण मोठा झालाय ना... म्हणून स्वाती काकू आता ऑफीसला नाही जात...
आई, मग आता पुष्कर दादा, निरज दादा कमवायला लागलाय म्हणून स्वाती काकू ऑफीसला नाही जात का?...........
थोड्यावेळासाठी नाही कळलं, काय उत्तर द्यावं पण मग 'हो' म्हणून पुढचे प्रश्न थांबवलेत. 
हो... आता दादा कमवतोय ना म्हणून स्वाती काकूंना ऑफीसला नाही जावं लागत...
मग मी पण मोठा झाल्यावर कमवायला लागेल तेव्हा तू पण नाही जाणार ना ऑफीसला...
!यथार्थ! 
#Childhood 
Share #Love Respect the #Thought ☺️

0 comments:

Post a Comment