रात्रीचे दहा वाजलेले... (गडचिरोलीत हे एक डॉ. रात्री 10 पर्यंत हमखास असतातच) एक मध्यमवर्गीय जोडपं, आपल्या बाळाला घेवून दवाखान्यात आले होते. आहे त्या परिस्थितीत ते घरातून निघाले असतील असं एकूणच त्या बाळाच्या आणि त्यांच्या कपड्यांवरून अंदाज आला. एखाद्या घरगूती पूजेच्या कार्यक्रमातून ते थेट ईथे आले असतील असंच त्या महिलेच्या हळदी कुंकूनी भरलेल्या कपाळावरून स्पष्ट दिसत होतं. आत डॉक्टरांच्या केबीनमध्ये जाण्यापूर्वी नर्स ने त्या बाळाचं वजन करायला सांगीतलं....