
२०२१ चे आभार आणि नवीन वर्षाचे मनापासून स्वागत. २०२१ मध्ये जीव वाचवून नवे जीवन जगतोय, हेच खूप आहे. कोरोनाचा भर असताना सुरक्षीत असलेल्या माझ्या कुटूंबाला २०२१ सुरू होण्याआधीच आजारांनी गाठलं. सर्वात पहिले सासूबाईंना शेवटच्या स्टेजचा कोरोना. त्यातच त्यावेळी सरकारी दवाखान्यात गेलं की आपले प्रेतच बाहेर येणार हीच धारणा सर्वांची झाली होती. तेव्हा सासूबाईंना अखेर आम्हाला कोविड सेंटरमध्ये...